shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सलाम आदिशक्तीला, सलाम नारी शक्तीला एल.जी. बनसुडे विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात

*सलाम आदिशक्तीला, सलाम नारी शक्तीला एल.जी. बनसुडे विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात 
इंदापूर : पळसदेव (ता- इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये ८ मार्च हा जागतिक महिला दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा, आहार , उच्च ध्येय व संस्कार या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे असे प्रास्ताविक प्राचार्या वंदना बनसुडे  यांनी करीत सर्व महिला शिक्षिकांना व विद्यार्थिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी असणाऱ्या नायब तहसीलदार निर्मला मखरे यांनी आपले संस्कार व आपली संस्कृती तसेच कुटुंब व्यवस्था हेच आपले सुरक्षा कवच असते व यांचा अवलंब करूनच आपण आपले उच्च ध्येय प्राप्त करू शकतो असे विचार व्यक्त केले. वैशाली कुचेकर यांनी मुलींसाठी असणारी संरक्षण कलमे व तिरंगी आहार याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पतंजली योगशिक्षिका प्रतिभा गुजराती यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात शारीरिक व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी कविता, नाटिका, चारोळ्या, भाषण यातून महत्व आणि स्त्री जागृतीचे दर्शन घडविले. सर्व विभागातील महिला शिक्षिकांचा तसेच शिक्षकेतर महिला कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.संस्थेच्या कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, शहाभाभी, सदस्या अनुराधा कणके, अर्चना बनसुडे, हनुमंत मोरे, सचिव नितीन बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे,समन्वयक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख ज्योती मारकड, तेजस्विनी तनपुरे, सीमा बाराते सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी ऋतुजा बांडे, शर्वरी जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन विद्या पोटे यांनी केले.
close